🌷🌷अन्नपचन प्रक्रिया🌷🌷
🌾सजीवाने अन्न ग्रहन केल्यापासून ते उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्याच्या अवस्थेपर्यंत अन्नावर घडणार्या संपूर्ण प्रक्रियेला अन्नाची पचन क्रिया असे म्हणतात.
🌾अन्न पचण्याची प्रक्रिया चालू असतांना त्या अन्नात या अवयवांकडून अनेक स्त्राव सोडले जातात.
🌾या स्त्रावामध्ये विकरे, आम्ल, उत्प्रेरक, यांचा समावेश होते.
🌾या स्त्रावामुळे अन्नातील जटिल घटकांचे सुलभ घटकात रूपांतर होते. ज्यामुळे अन्न पचण्यास सुलभ जाते.
🌾खाल्लेले अन्न पचविण्याच्या क्रियेत खालील अवयवांचा महत्वाचा सहभाग असतो. अन्नपचनाची प्रक्रिया खालीलप्रकारे पाडली जाते.
🌿1. अंग पदार्थ – मुख व गुहा
स्त्राव – लाळ
विकर – टायलिन
माध्यम – अल्पांशाने
मूळ अन्न पदार्थ – पिष्टमय पदार्थ
क्रिया आणि अंतिम – शर्करा (माल्टोज)
🌿2. अंग पदार्थ – जठर
स्त्राव – हायड्रोक्लोरिक
माध्यम – आम्ल, अॅसिड
मूळ अन्न पदार्थ – प्रथिने
क्रिया आणि अंतिम – जंतुनाशक
🌿3. अंग पदार्थ – जठररस
स्त्राव – पेप्सीन,रेनीन
माध्यम – आम्ल
मूळ अन्न पदार्थ – प्रथिने, दूध
क्रिया आणि अंतिम – सरल प्रथिने (पेप्टोन), व्हे मध्ये रूपांतर
🌿4. अंग पदार्थ – लहान आतडे
स्त्राव – पित्तरस
माध्यम – अल्कली
मूळ अन्न पदार्थ – प्रथिने व मेद
क्रिया आणि अंतिम – मेदाचे विघटन व अन्न जंतूनाशक करणे.
🌿5. अंग पदार्थ – स्वादुपिंडरस
विकर – ट्रिप्सीन, अमायलेझ, लायपेझ
माध्यम – अल्कली, अल्कली
मूळ अन्न पदार्थ – प्रथिने(पेप्टोन), पिष्टमय पदार्थ, मेद
क्रिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, शर्करा व ग्लुकोज, मेदाम्ल व ग्लिसरॉल
🌿6. अंग पदार्थ – आंत्ररस
विकर – इरेप्सीन, इनव्हरटेझ, लायपेझ
माध्यम – अल्कली
मूळ अन्न पदार्थ – प्रथिने, शर्करा, मेद
क्रिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, ग्लुकोज, फ्रूटोज व माल्तैझ, मेदाम्ल व ग्लिसरॉल.
No comments:
Post a Comment