👉पूर्वचरित्र
महाराष्ट्राचे सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र असलेल्या पुणे शहरात ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोज बुधवार चैत्रशुद्ध 15 शके 1749 रोजी झाला. ज्योतिरावांचे आजोबा शेटीबा हे पुण्याजवळ कटगुन चे राहणारे फुले घराण्याचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होय. त्यांचे मूळ आडनाव गोरे असे होते. ते जातीने क्षत्रिय माळी होते. बारा बलुतेदारांपैकी चौगुले हे एक होते. परंतु गावातील प्रस्थापितांच्या बरोबर त्यांच्या पणजोबांचे भांडण झाले त्यामुळे त्यांनी गाव सोडले आणि पुरंदर तालुक्यातील खानवडी गावी स्थलांतर केले. तेथे चांगला जम बसविला. त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव शेटीबा ठेवण्यात आले. शेटीबा भोळसट व उधळट होते. तसेच त्यांना व्यसनही लागले होते. त्यांनी संपूर्ण इस्टेट उधळली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची स्थिती वाईट झाली. त्यामुळे शेरिबांना उदरनिर्वाहासाठी कुटुंबाचे स्थलांतर पुण्याला करावे लागले. त्यांना रानोजी, कृष्णा व गोविंदा अशी तीन मुले होती. घरच्या बिकट परिस्थितीमुळे प्रारंभी या मुलांनी शेळ्या राखण्याचे काम केले. त्यांच्या धन्याने त्यांचा प्रामाणिकपणा, हुशारी व कष्टाळूपणा पाहून त्यांना फुलांचा व्यवसाय मिळवून दिला. त्यांनी या व्यवसायात चांगलाच लौकिक कमावला. त्यामुळे त्यांचे 'गोरे' हे मूळ आडनाव मागे पडून 'फुले' या नावाने ते ओळखले जाऊ लागले. पेशव्यांच्या कानावर त्यांची कीर्ती गेली. पेशव्यांनी त्यांना खासगीत फुले टाकण्याचे काम दिले व त्याचबरोबर 35 एकर जमीन इनाम दिली.
शेट्टीबा यांच्या मृत्यूनंतर राणोजीने आपल्या दोन बंधूना बाजूला सारून इनाम जमीन स्वतःच्या नावे करून घेतली. त्यामुळे पुन्हा कृष्णा व गोविंदा यांना वाईट दिवस आले. त्यांनी पूर्वीप्रमाणेच चिकाटी व सचोटीने आपला धंदा चालविला. भाजीपाला विक्रीचे दुकान आहे त्यांनी सुरू केले. गोविंदाचा चिमणाबाईशी विवाह झाला. त्यांच्या पोटी ज्योतिबा व राजाराम यांचा जन्म झाला. ज्योत दुसऱ्याला प्रकाश देते व स्वतः नाहीशी होते. त्याचप्रमाणे ज्योतीबाने समाजसेवेत संपूर्ण महाराष्ट्रात आपले नाव अजरामर केले.
ज्योतिबा फुले एक वर्षाचे असताना त्यांची आई मृत्यू पावली. गोविंदरावांनी आपल्या मुलांना शिक्षण मिळावे असे वाटत होते. त्यामुळे त्यांनी ज्योतिबाला सातव्या वर्षी खाजगी शाळेत घातले. वातावरण पोषक नव्हते शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटले नव्हते. गोविंदरावाचा इतर लोकांनी बुद्धीभ्रम केला.परिणामी ज्योतिबांना शाळेतून काढण्यात आले. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह धनकवडीच्या झगडे पाटील यांच्या सावित्रीबाई या कन्येशी झाला.
ज्योतिबाची चिंतनशीलता बौद्धिक कौशल्य पाहून त्यांच्या शेजारी राहणारे उर्दू शिक्षक गफार बेग मुंशी आणि धर्मोपदेशक लिजिट साहेब यांनी त्यांचे शिक्षण पुन्हा चालू करावे असा आग्रह गोविंदरावांकडे धरला. त्यांना त्यांनी मुलाच्या कर्तुत्वाला वाव मिळण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे हे पटवून दिले. गोविंदरावानाही हे विचार पटले. यांनी पुन्हा ज्योतिबास शाळेत घालण्याचा निर्णय घेतला. इसवी सन 1841 मध्ये त्यांनी एका स्कॉटिश मिशनरी शाळेत जाण्यास सुरुवात केली. ते सदाशिव गावंडे या ब्राह्मण मित्राच्या सहवासात त्यांनी शिवाजी यांची चरित्रे अभ्यासली, राईट्स ऑफ मॅन या थॉमस पेन यांच्या ग्रंथाचा त्यांच्यावर परिणाम झाला.
👉घटना
स्वातंत्र्य व लोककल्याण यांचा विचार करीत असताना ज्योतीबांच्या जीवनात एक महत्त्वाची घटना घडली. ज्योतिराव आपल्या एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेले असता, वरातीमध्ये ब्राह्मणांनी त्यांचा शूद्र म्हणून अपमान केला व त्यांना वराती मागून यायला सांगितले. तेव्हापासून सामाजिक विषमता बद्दल त्यांच्या मनात चीड निर्माण झाली. सामाजिक विषमतेविरुद्ध संघर्ष केला पाहिजे असा त्यांनी निर्धार केला. सामाजिक प्रतिष्ठेचा हा कलंक त्यांच्या पुढील आयुष्याचे उगमस्थान ठरला. पुढे या वैयक्तिक अपमानाचेव रूपांतर विशाल ध्येयशक्तीत झाले.
👉शैक्षणिक कार्य
अज्ञानरूपी अंधकाराला दूर करण्यासाठी शिक्षणासारखे दुसरे अस्त्र नाही. शिक्षणाने मनुष्याला सत्य सत्याचा व अंतिम हिताचा विचार करण्याची शक्ती प्राप्त होते. शिक्षण हे सुधारणेचे मूळ आहे. त्यातून अभिमानाची जाणीव जागृत होते हे ज्योतिरावांनी ताडले होते. त्यातल्या त्यात स्त्रियांना शिक्षण म्हणजे पुढे संपूर्ण कुटुंबाचे शिक्षण असे ज्योतिरावांचे मत होते.
पेशवाई जाऊन इंग्रजांची राजवट आली तरीही लोकांवर पेशवाईचा प्रभाव होता. पुण्यात स्त्रियांना शिक्षणाची अजिबात सोय नव्हती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. ही शाळा बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात भरत असे. त्या काळात शिक्षक मिळणे कठीण असल्यामुळे, जोतिबांनी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षिका म्हणून नेमले. ही गोष्ट त्या काळी सनातन्यांना पटली नाही. म्हणून त्यांनी सावित्रीमाईचा नाना प्रकारे छळ करणे आरंभिले. परंतु त्या आपल्या कामात मग्न होत्या,सनातनी लोकांना त्या म्हणत, "मी आपले कर्तव्य करीन, देव तुम्हास क्षमा करो"
गोविंदराव असणाऱ्यांचा दबाव आल्यामुळे त्यांनी ज्योतिबांना घराबाहेर काढले. तसेच दरम्यानच्या काळात आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे काही दिवस शाळा बंद ठेवावे लागली. आर्थिक परिस्थिती सुधारता त्यांनी जुनागंज पेठेत शाळा उघडली. मेजर कँडी या शाळेला पुस्तके पुरवीत. 3 जुलै 1851 ला ही शाळा चिपळूणकरांच्या वाड्यात नेण्यात आली. त्यात मुलींची संख्या 48 होती. पुढे 17 सप्टेंबर 1851 मध्ये रास्ता पेठेत त्यांनी मुलींची तिसरी शाळा काढली. तर चौथी शाळा 1852 मध्ये वेताळ पेठेत काढले. ज्योतीबांच्या शाळांच्या बाबतीत "पुना आब्जरव्हर" या वृत्तपत्राने असे मत व्यक्त केले की "ज्योतीबांच्या शाळेतील मुलांची पटसंख्या सरकारी शाळेतील पटसंखे पेक्षा दहा पटीने मोठी आहे." "ज्ञानप्रकाश" या वृत्तपत्रांच्या अंकात असे व्यक्त केले ही "सर्व जातीच्या मुलांसाठी ज्योतिराव फुले करून लिहिणे, वाचणे शिकवत आहेत. या स्तुत्य कामाच्या सन्मानार्थ सरकारने एक शालजोडी देण्याचा हुकूम केला आहे व ती शालजोडी बोर्डामार्फत कचेरीतुन सदरहू गृहस्थास देण्यात येणार आहे."
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचे कार्य केले त्याबद्दल सरकारने सन 1852 मध्ये विश्रामबागवाड्यात त्यांचा जाहीर सत्कार केला.
👉स्त्री उद्धाराचे कार्य
त्याकाळी स्त्रियांची स्थिती अत्यंत दयनीय होती. तिला पुरुषाबरोबर समानतेचा दर्जा नव्हता. स्त्रियांकडे केवळ उपभोग्य वस्तू म्हणूनच पाहिले जात असे, 'चूल व मूल' एवढेच तिचे कार्यक्षेत्र मानले जाई. समाजामध्ये बाल विवाह पद्धती असल्याने बालविवाह यांची संख्या खूप होती. या स्त्रिया नैसर्गिक विषयवासनेच्या पोटी अनैतिक मार्गांचा अवलंब करीत. अनौरस संततीच्या भीतीने भ्रूण हत्या केली जाई. केशवपण सारख्या चाली रूढ होत्या अशावेळी ज्योतिरावांनी स्त्री उद्धाराचे कार्य हाती घेतले.
सन 1864 मध्ये ज्योतिबा फुले यांनी पुण्यातील गोखले बागेत शनवी जातीत एक पुनर्विवाह घडवून आणला. विधवा स्त्रियांना लैंगिक भावना व अपत्यप्रेम यापासून वंचित राहावे लागे. काहीवेळा पुरुषांच्या वासनेला बळी पडत व नवीन जन्माला येणार्या अर्भकाची हत्या करीत. भ्रूणहत्या थांबावी या उद्देशाने ज्योतिरावांनी 1864 मध्ये आपल्या राहत्या घरात 'भ्रूणहत्या प्रतिबंधक' (बाल हत्या प्रतिबंधक) गृह उघडले. जोतीरावांनी सुरू केलेले बालहत्या भारतातील पहिलेच होते. त्यावेळेस त्यांनी एक जाहिरातीकरिता पत्रके लावली. या पत्रकातील मजकूर पुढील प्रमाणे, "विधवांनो इथे येऊन गुप्तपणे व सुरक्षितपणे बाळंत व्हा, तुम्ही आपले मूल न्यावे किंवा येथे ठेवावे हे तुमच्या खुशीवर अवलंबून राहील. त्या मुलाची काळजी अनाथ आश्रम घेईल." याच आश्रमात काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेस मुलगा झाला. त्याचे नाव यशवंत ठेवून पुढे त्याला जोतीरावांनी दत्तक घेतले तसेच बहुपत्नीकत्व विरोध केला. 16 नोव्हेंबर 1852 रोजी मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली सरकारी विद्यार्थ्याने त्यांचा शाल जोडी देऊन सत्कार केला त्यावेळी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे केवळ दहा वर्षाचे होते गोपाळ गणेश आगरकर पंडिता रमाबाई महर्षी कर्वे यांचा त्या वेळी जन्मही झाला नव्हता.
👉अस्पृश्यांसाठी केलेले कार्य
त्याकाळी अस्पृश्यांवर अनन्वित अत्याचार होतो सकाळ-संध्याकाळ त्यांना गावात फिरायची परवानगी नसेल त्यांच्या गळ्यात मडके व कमरेला खराटा बांधून जात असे यावरून उच्चवर्णीयांमध्ये अस्पृश्याबद्दल असणारी घृणा प्रकट होते.
ज्योतीबांनी1852 मध्ये अस्पृश्यांसाठी वेताळ पेठेत शाळा सुरू केली. 1853 मध्ये मित्रांच्या सहाय्याने त्यांनी महार मांग इत्यादी लोकांना विद्या शिकविण्याकरिता मंडळी नावाची संस्था स्थापन केली.लहुजी मान राजभा महार यासारख्या अस्पृश्य लोकांना हाताशी घेऊन शुद्र समाजात शिक्षणाची गोडी निर्माण केली.
1868 मध्ये जोतिबांनी आपल्या घराजवळचा पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला वडीलांच्या श्राद्धाचे जेवण भाऊबंदांना घालण्याऐवजी जोतिरावांनी आंधळ्या-पांगळ्याना घातले .
Nice
ReplyDeleteसुंदर
ReplyDelete