Sunday, June 16, 2024

नवीन म्हणी New Idioms in Marathi

हसून हसून पोट दुखेल बाबाआजोबा आता तुमचा जमाना गेला...आता आमच्या नवीन म्हणी ऐका...आधुनिक युगाच्या अफलातून आधुनिक म्हणी-

🍥 १) राहायला नाही घर म्हणे लग्न कर !

🍥२) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये !

🍥३) खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन !

🍥४) मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क !

🍥५) चुकली मुलं सायबरकॅफ़ेत !

🍥६) चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये !

🍥७ ) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार !

🍥८) नाजुक मानेला मोबाईलचा आधार !

🍥९) मनोरंजन नको रिंगटोन आवर !

🍥१०) स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा !

🍥११) जागा लहान फ़र्निचर महान !

🍥१२) उचलला मोबाईल लावला कानाला !

🍥१३) रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार !

🍥१४) काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं

🍥१५) साधुसंत येती घरा, दारंखिडक्या बंद करा !

🍥१६) ज्याची खावी पोळी, त्यालाच घालावी गोळी

🍥१७) एकमेका पुरवू कॉपी, अवघे होऊ उत्तीर्ण !

🍥१८) लांबून देखणी, जवळ आल्यावर चकणी !

🍥१९) चोर्या करुन थकला आणि शेवटी आमदार झाला

🍥२०) आपले पक्षांतर, दुसर्याचा फुटीरपणा !

🍥२१) प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे !

🍥२२) अन्यायाचा फास बरा, पण चौकशीचा त्रास आवरा !

🍥२३) जया अंगी खोटेपण, तया मिळे मोठेपण !

🍥२४) एल.एल.बी झालो अन भिकेला लागलो !

🍥२५) सरकार जेवू घालीना, पदवी भिक मागू देईना

🍥२६) वशिल्याच्या नोकरीला इंटरव्ह्यु कशाला !

🍥२७) वयही गेले, पैसेही गेले, हाती राहीले दाखले !

🍥२८) घोड्याच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे !

🍥२९) साहेबापुढे वाचली गीता, कालचा मेमो बराहोता !

🍥३०) गाढवापुढे वाचली गीता वाचणारा गाढव होता !

🍥३१) स्मगलींगचे खाणार, त्याला दाऊद देणार !

🍥३३) न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला!

🍥३४) पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा !

🍥३५) पुढार्याचं मुळ व हॉटेलची चूल पाहु नये !

🍥३६) नाव सुलोचनाबाई, चष्म्याशिवाय दिसत नाही !

🍥३७) नाव गंगूबाई, आंघोळीला पाणी नाही!

🍥३८) घरात नाही दाणा आणी म्हणे बर्शन आणा !

🍥३९) घरावर नाही कौल पण अॅंटीनाचा डौल !

🍥४०) घाईत घाई त्यात चष्मा नाही !

🍥४१) रिकामा माळी ढेकळ फोडी !

🍥४२) घरोघरी मॉडर्न पोरी !

🍥४३) ओठापेक्षा लिपस्टीक जड !

🍥४४) नाकापेक्षा चष्मा जड !

🍥४५) अपुऱ्या कपडयाला फॅशनचा आधार !

🍥४६) बायकोची धाव माहेरापर्यंत !

🍥४७) गोष्ट एक चित्रपट अनेक !

🍥४८) काम कमी फाईली फार!

🍥४९) लाच घे पण जाच आवर !

🍥५०) मंत्र्याच पोर गावाला घोर !

🍥५१) मरावे परी मूर्तिरुपे उरावे !

🍥५२) नटीच्या लग्नाला सतरा नवरे !

🍥५३) मिळवत्या मुलीला मागणी फार !

🍥५४) रिकामी मुलगी शृंगार करी!

🍥५५) प्रेमात पडला हुंडयास मुकला !

🍥५६) दुरुन पाहुणे साजरे !

🍥५७) ऑफीसात प्यून शहाणा !

🍥५) सत्ता नको पण खैरनार आवर !

🍥५९) एक ना धड भाराभर पक्ष !

🍥६०) हरावे परी डिपॉझिटरुपी उरावे !

🍥६१) थेंबे थेंबे लोकसंख्या वाढे !

🍥६२) तोंडाला पदर गावाला गजर !

🍥६३) कष्टानं कमावलं बाटलीनं गमावलं !

🍥६४) रात्र थोडी डास फार !

🍥६५) शिर सलामत तो रोज हजामत

🍥६६) नेता छोठा कटआऊट मोठा !

🍥६७) चिल्लरपुरता सत्यनारायण!

🍥६८) दैव देते आयकर नेत !

🍥६९) डीग्री लहान वशिला महान!

No comments:

Post a Comment

QUIZ ON SOCIAL SCIENCE

Tourism Management MCQs

Tourism Management MCQs UNIT -1 1. Tourism sector creates more _________ opportunities 1. **Job 2. Fund raising 3. Profit makin...

Latest NewsWELCOME TO SMARTPEOPLESMARTLEARNING.BLOGSPOT.COM
Thank You for site Visit. Follow our blog.