Showing posts with label स्वामी दयानंद सरस्वती. Show all posts
Showing posts with label स्वामी दयानंद सरस्वती. Show all posts

Wednesday, January 13, 2021

 स्वामी दयानंद सरस्वती 

(जन्म : मोरबी, १२ फेब्रुवारी १८२४; मृत्यू : मुंबई, ३० ऑक्टोबर १८८३) 

हे भारतीय समाजसुधारक व आर्य समाजाचे संस्थापक होते. 

आक्रमक व निर्भय धर्मसुधारक, कुशल संघटक आणि हिंदी भाषेचे राष्ट्रीय स्वरूप ओळखणारे महर्षी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक प्रसिद्ध आहे. 

स्वामी दयानंद सरस्वती यांनी वरील ग्रंथामध्ये आर्य समाजाच्या तत्त्व विचारांची मांडणी केलेली आहे स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे व तो आम्ही मिळवणारच असे प्रतिपादन करणारे पहिले धर्मसुधारक म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती हे होत

वैदिक धर्माचा प्रचार करण्यासाठी दयानंदांनी १० एप्रिल १८७५ रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली.

 वेदांतील तत्त्वज्ञानाचे यथार्थ ज्ञान व्हावे म्हणून यांनी "सत्यार्थ प्रकाश" नावाचा ग्रंथ संस्कृत व हिंदी भाषेत लिहिला. सत्यार्थ प्रकाश ग्रंथात वैदिक धर्माचे यथार्थ स्वरूप प्रतिपादन करताना इतर पंथमतांचे खंडनही त्यांना करावे लागले.

 या प्रचारात्मक ग्रंथानंतर वेदाचा अर्थ समजण्याकरिता यांनी "वेदभाष्य" लिहिण्यास सुरुवात केली पण तो ग्रंथ अपुराच राहिला. यानंतर "संस्कारविधी" हा ग्रंथ लिहून सोळा संस्कारांचे वर्णन व प्रयोग यांनी दिले. "पंचमहायज्ञविधी" या लहानशा ग्रंथात नित्य करावयाच्या यज्ञाचे यांनी विवेचन केले.

 "गोकरुणानिधी" या ग्रंथात यांच्या अंत:करणाचे प्रतिबिंब पहावयास मिळते.

  आर्य समाजाचे कार्य 

आर्य समाजाच्या तत्त्वांचा प्रचार ते प्रथम अहमदाबाद, बडोदे, पुणे, मुंबई या ठिकाणी गेले त्यानंतर दिल्ली येथे भरणाऱ्या दरबारासाठी गेले. तेथे सर्व धर्मांच्या प्रतिनिधींना बोलाविलेले होते व चर्चेसाठी पाच प्रश्न ठेवलेले होते. दयानंदांनी त्या प्रश्नांची यथायोग्य उत्तरे दिल्यामुळे उत्तर हिंदुस्थानात व विशेषत: पंजाबात त्यांच्या मताचा चांगलाच बोलबाला झाला.

 शैक्षणिक संस्था, गुरुकुले व अनाथालये निघून होमहवनादी वैदिक पद्धतीचे कार्यक्रम तिकडे होऊ लागले.

  महर्षी दयानंद यांनी लिहिलेली पुस्तके 

🍀  गोकरुणानिधी

🌸  पंचमहायज्ञविधी

🍀  वेदभाष्य (अपूर्ण)

🍀  सत्यार्थ प्रकाश

🌸  संस्कारविधी

QUIZ ON SOCIAL SCIENCE

ANCIENT INDIA : MCQs-2

101. The Eight-fold path was enunciated by (a) The Buddha (b) Mahavira (c) Nehru (d) Mahatma Gandhi 👁Answer C...

Latest NewsWELCOME TO SMARTPEOPLESMARTLEARNING.BLOGSPOT.COM
Thank You for site Visit. Follow our blog.